मी २००० साली मुंबईला आलो तेव्हा माळशेज घाट हे नाव मी कदाचित पहिल्यांदा ऐकलं. दरवर्षी पावसाळा आला की ऑफिस मधे माळशेज घाटात सहलीचे वारे व्हायचे आणि श्रावण सरींबरोबर ओसरून जायचे. पाऊस मला तेव्हा फारसा आवडतही नव्हता. मिलिंद इंगळे आणि सौमित्र यांच्या 'गारवा' नी मनात गारवा जरी रुजवला होता तरी पाऊस म्हणावा तसा किंवा खूप आवडावा तसा मनात रुजला नव्हता. पुढल्या काही वर्षात संदीप खरेंच्या कवितांनी मात्र पाऊस आवडू लागला. म्हणजे
दूरं दूरं नभं पार डोंगराच्या माथ्यावर
निळे निळे गार गार पावसाचे घर दार
सरीवर सरं....
किंवा
पाऊस असा रुणझुणता पैंजणे सखीची स्मरली
किंवा
तुझ्या माझ्या सावे कधी गायचा पाऊस ही
आणि अगदी
अग्गो बाई ढग्गो बाई
या यासगळ्या कवितांनी मी वेडाच झालो. शिवाय रोज गोरेगाव ते ठाणे, घोडबंदर रस्त्यानं जाता जाता पाऊस भिनला. पण संदीपच्याच एका कवितेत एक ओळ आहे
पाऊस आवडणारे झाले
कुणी डुक्कर कोणी मोर
आता या पैकी मी डुक्कर किंवा मोर या दोन्ही कॅटॅगिरीत नाही. मला आवडणारा पाऊस खिडकीत बसून कॉफी किंवा चहा पीत अळशीपणाचा कहर करत जो खिडीतून दिसतो आणि जे तुषार उडतात तो पाऊस मला आवडतो. फार फार तर
एक अकेली छत्री में जब आधे आधे भिग रहे थे.... इथपर्यंत ठीक आहे.
२००५ ला एकदा ऐन पावसाळ्यात लोहगड गाठला होता आणि जीव मुठीत घेऊन कसे बसे खाली आलो. शिवाय २६ जुलै २००५ साली मुंबईत मी, भाऊ आणि बायको ज्यातून गेलो त्यानंतर पाऊस म्हंटला की धडकी जास्त भरते. तेव्हा ठरवले की किल्ल्याची मोहीम गणपती किंवा नवरात्र आटोपल्याशिवाय काढायची नाही. म्हणून माळशेज घाट गाठता गाठता २०१० साल उजाडले तेही एप्रिलच्या उन्हाळ्यात. माळशेज घाट ओलांडून लेण्याद्री आणि ओझरचे गणपती दर्शन घेत अष्टविनायक दर्शन केले होते. पण कुठलाही निसर्गप्रेमी पटकन प्रेमात पडेल असाच आहे माळशेज घाट!
दूरं दूरं नभं पार डोंगराच्या माथ्यावर
निळे निळे गार गार पावसाचे घर दार
सरीवर सरं....
किंवा
पाऊस असा रुणझुणता पैंजणे सखीची स्मरली
किंवा
तुझ्या माझ्या सावे कधी गायचा पाऊस ही
आणि अगदी
अग्गो बाई ढग्गो बाई
या यासगळ्या कवितांनी मी वेडाच झालो. शिवाय रोज गोरेगाव ते ठाणे, घोडबंदर रस्त्यानं जाता जाता पाऊस भिनला. पण संदीपच्याच एका कवितेत एक ओळ आहे
पाऊस आवडणारे झाले
कुणी डुक्कर कोणी मोर
आता या पैकी मी डुक्कर किंवा मोर या दोन्ही कॅटॅगिरीत नाही. मला आवडणारा पाऊस खिडकीत बसून कॉफी किंवा चहा पीत अळशीपणाचा कहर करत जो खिडीतून दिसतो आणि जे तुषार उडतात तो पाऊस मला आवडतो. फार फार तर
एक अकेली छत्री में जब आधे आधे भिग रहे थे.... इथपर्यंत ठीक आहे.
२००५ ला एकदा ऐन पावसाळ्यात लोहगड गाठला होता आणि जीव मुठीत घेऊन कसे बसे खाली आलो. शिवाय २६ जुलै २००५ साली मुंबईत मी, भाऊ आणि बायको ज्यातून गेलो त्यानंतर पाऊस म्हंटला की धडकी जास्त भरते. तेव्हा ठरवले की किल्ल्याची मोहीम गणपती किंवा नवरात्र आटोपल्याशिवाय काढायची नाही. म्हणून माळशेज घाट गाठता गाठता २०१० साल उजाडले तेही एप्रिलच्या उन्हाळ्यात. माळशेज घाट ओलांडून लेण्याद्री आणि ओझरचे गणपती दर्शन घेत अष्टविनायक दर्शन केले होते. पण कुठलाही निसर्गप्रेमी पटकन प्रेमात पडेल असाच आहे माळशेज घाट!
मुंबई ते माळशेज
मुंबई कडून कल्याण-मुरबाड मार्गे माळशेज घाट गाठता येतो. मुरबाड या गावाशी माझी ओळख श्री ना पेंडसेंच्या लव्हाळी या कादंबरीमुळे झाली. कल्याण सोडलं की जंगलाचा भाग सुरु होतो. दोन्ही बाजूला सागाच जंगल, काळाभोर डांबरी रस्ता अन त्याला छेद देत जाणारी पिवळ्या रंगाची लकेर आणखीन शोभून दिसते. हा रस्ता घाटाचा नसला तरी नागमोडी वळण घेत माळशेजला जातो. त्या सतत येणाऱ्या नागमोडी वळणांनी आपल्या सारखी त्यालाही माळशेज घाटात पोचायची ओढ लागली आहे की काय असं वाटल्या वाचून राहात नाही.
रस्ता निरखता निरखता ३५-४० कि मी संपतात आणि मुरबाड गावात एस. टी. ची ये जा भानावर आणते. स्वच्छतेची वानवा असणाऱ हे गाव निसर्ग सौन्दर्यात मात्र गर्भ श्रीमंत आहे. निसर्ग प्रेमीच्या डोळ्यांना मात्र समोरची डोंगर रांग इतकी खुणावते की तो त्या सौन्दर्यावर भाळतो आणि गावाबाहेर गाडी थाबवतो. या सह्याद्रीच्या उंच रांगेकडे पाहिलं की तोंडातून सहज आहाहा बाहेर येत. उजवीकडे जो उंच कडा दिसतो (tringular) त्याला म्हणतात ‘नानाचा अंगठा.!’ मराठी मुलखातली नाव अशीच आहे मराठमोळी! या नानाच्या अंगठ्या शेजारी एक हजारो वर्षापूर्वीची वाट आहे याला म्हणतात नाणे घाट!
मुंबई कडून कल्याण-मुरबाड मार्गे माळशेज घाट गाठता येतो. मुरबाड या गावाशी माझी ओळख श्री ना पेंडसेंच्या लव्हाळी या कादंबरीमुळे झाली. कल्याण सोडलं की जंगलाचा भाग सुरु होतो. दोन्ही बाजूला सागाच जंगल, काळाभोर डांबरी रस्ता अन त्याला छेद देत जाणारी पिवळ्या रंगाची लकेर आणखीन शोभून दिसते. हा रस्ता घाटाचा नसला तरी नागमोडी वळण घेत माळशेजला जातो. त्या सतत येणाऱ्या नागमोडी वळणांनी आपल्या सारखी त्यालाही माळशेज घाटात पोचायची ओढ लागली आहे की काय असं वाटल्या वाचून राहात नाही.
रस्ता निरखता निरखता ३५-४० कि मी संपतात आणि मुरबाड गावात एस. टी. ची ये जा भानावर आणते. स्वच्छतेची वानवा असणाऱ हे गाव निसर्ग सौन्दर्यात मात्र गर्भ श्रीमंत आहे. निसर्ग प्रेमीच्या डोळ्यांना मात्र समोरची डोंगर रांग इतकी खुणावते की तो त्या सौन्दर्यावर भाळतो आणि गावाबाहेर गाडी थाबवतो. या सह्याद्रीच्या उंच रांगेकडे पाहिलं की तोंडातून सहज आहाहा बाहेर येत. उजवीकडे जो उंच कडा दिसतो (tringular) त्याला म्हणतात ‘नानाचा अंगठा.!’ मराठी मुलखातली नाव अशीच आहे मराठमोळी! या नानाच्या अंगठ्या शेजारी एक हजारो वर्षापूर्वीची वाट आहे याला म्हणतात नाणे घाट!

आता नाणे घाट का? शातवाहन-शिलाहार (याचाच मग शेलार असा अपभ्रंश झाला) राजांच्या राज्यात किंवा त्याही पूर्वी पासून हा शूर्पकार (नाला सोपारा!) नगरला जाणारा महत्वाचा ट्रेड रूट. इथे जकात वसूल केली जात असे. ज्या रांजणांमध्ये जकात जमा होई त्यातील एक रांजण आजही इथे बघायला मिळतो. यात नाणी जमा होत म्हणून नाणे घाट! शूर्पकार नगर हे २०००-२५०० हजार वर्षांपूर्वीच खूप मोठं आणि महत्वाचं बंदर. इथं जहाज बांधणी होई.
मुरबाडच्या ह्या थांब्यावर हे दृश्य डोळ्यात भरवून घ्यावं. उभे असल्यापासून ते त्या कड्यापर्यंत हिरव्या रंगाच्या अनेक छटा आपलं लक्ष वेधतात. मी हे पावसाळ्यात पाहिलं आणि ऐन उन्हाळ्याच्या सुरवातीला ही पाहिलं. सह्याद्री मला तर कुठल्याही रूपात आवडतो. उलट पावसाळा सरला की हा हिरवं सोवळं बदलून सोन्याचं पितांबर नेसतो. त्याचं पिळदार आणि टणक शरीर नुसतं पाहत बसावं. काळी कातळ, कपारी, हजारो फूट उंच वर्षानुवर्षे उभ्या भिंती की इथं झेपाव ते फक्त गरुडानं अन धावावं ते वाघानं! अश्याच एका गरुडांनं इथं सह्याद्रीत ४३०० फुटावर एक घरटं बांधलं होतं ‘राजगड‘ हे त्या घरट्याच नाव!
पुढे निघालं की रस्ता डावीकडे कूस बदलतो आणि हे सह्याद्री मंडळ राहतं उजव्या बाजूला. मी आतापर्यंत तीनदा गेलो तिन्ही वेळी रस्ता एकदम मस्त होता. थोडाचवेळात घाट सुरु होतो आणि दिशा बदलली त्यामुळे दृष्टी आड झालेले ते उंच कडे पुन्हा स्वागताला उभे असल्याचं लक्षात येतं. पण नानाचा अंगठा मात्र इथून दिसत नाही. हवा गार होऊ लागते, उन्हाळ्यात हे विशेष करून जाणवतं. कोकण आणि पठाराला जोडणारी ही ३००-३५० छोट्या मोठ्या घाट वाटांपैकी एक. याच्या उत्तरेला महत्वाची वाट म्हणजे कसारा, दक्षिणेला बोर घाट (मुंबई-पुणे, कितीदा तुडवला कुणास ठाऊक?), त्यानंतर ताम्हाणी, वरंधा, गगनबावडा. मराठी मुलखातली नाव बघा कशी गाढव लोटीचा घाट, शेवत्या, सवाष्ण, रडतोंडीचा (महाबळेश्वर) घाट! या पैकी हा माळशेज घाट घाटांचा राजा शोभावा असाच आहे! याच कारण याची उंची, विहगंमता आणि इथं पाहावं सह्याद्रीचं रांगडं, बोडखं आणि रौद्र स्वरूप! यानंतर मला सगळ्यात आवडणारा घाट म्हणजे गगनबावडा! कोल्हापूर गाठा आणि बावड्याच्या घाटान वैभव वाडीत उतरा, म्हणाल परमेश्वरा मला इथंच का नाही रे जन्माला घातलं? असले विचार सारतात न सारतात तोच समोरचे उभे काळे कभिन्न कातळ लक्ष वेधतात. थम्ब्स अप चे अनेक सुळके दृष्टीस पडतात. इथंच कुठेतरी भैरवगड लपला आहे. पावसाळ्यात हे अर्ध धुक्यात हरवलं असत. एका वळणावर एक पटी लागते नाणे घाट पायी वाट. इथून २ तासात वर नाणे घाट चढता येतो की अगदी रांजणात सुद्धा डोकावू शकाल. आणखीन थोडं पुढं गेलं की रेनबो नावाचं एक हॉटेल लागत. खूप मोक्याच्या ठिकाणी आहे हे हॉटेल. इथून छायाचित्रणाची उत्तम संधी मिळते. या रेनबो हॉटेलच्या आवारातून सह्याद्रीच जे दर्शन घडतं ते पाहिलं की चटकन आठवतात त्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या ओळी
मराठी मुलखानी या सहयाद्रीला खूप सजवला धजवला
कोणी शिल्प सोनारांनी त्याच्या अंगाखांद्यावर लेण्या कोरल्या
तर कुणी जेजुरीच्या रूपानं याच्या मनगटात कडी, तोडे आणि पेट्या बांधल्या
त्याला सजवला-धजावला तरी तो दिसायचा तसाच दिसतो
रामोश्या सारखा!
बेताल बेलाग कडे कशाला म्हणतात हे इथून दिसतं. छाताडावर येणाऱ्या अनेक सुळक्यांचा समूह. इथून पुढे खरा घाट आणि विहंगम दृश्यांची मालिकाच सुरु होते. मुळात ठाणे, पुणे आणि नगर यांच्या सीमारेषेवर अनेक किल्ल्याच्या सानिध्यात मुकुटातल्या शिरपेचा सारखा इथला सह्याद्री, आणि माळशेज म्हणजे त्यातील जिवंत वाहती वाट. घाटातून जाताना उजवीकडे पाहिलं तर सहज लक्षात येतं की पलीकडील डोंगर रांग उंच आहे. वर चढता-चढता अनेक थांबायची ठिकाणं येतात. एका कुठल्याश्या थांब्यावरून एक मोठ्ठा धबधबा ही दिसतो, वाऱ्याचा जोर असेल तर तो उलटा वाहतानाही दिसतो. घाट चढत चढत मग माळशेज घाटाची ओळख असणारी जागा येते ती म्हणजे एक छोटा बोगदा, बोगदा कसला टॉम अँड जेरी पैकी जेरीचं बिळचं ते! माझं लहानपण अजून शाबूत आहे या छोट्या बोगद्यातून जाताना मी माझ्या वय वर्ष ७, मुलीबरोबर ओरडलो हो SSSS . गम्मत, मजा मस्ती चालली असताना गाडी मात्र जपून चालवावी लागते. माळशेजघाट जितका सुंदर तितकाच तो रौद्र आणि कठोर आहे. इथे चुकीला माफी नाही. हा घाटातल्या रस्त्यातला सगळ्यात उंच भाग. मधे- मधे अनेक छोटे मोठे धबधे आहेत, हौशी मंडळी भिजतात याच्यात. मी या भानगडीत पडत नाही, मी पावसाची मजा खिडकीत बसून घेतो!
इथं अमेरिकेत नायगारा आहे, ग्रँड कॅन्यन आहे, रॉकीज आहे पण माळशेज तो माळशेज. हे फक्त मी नाही तर माझी आता वय वर्ष १२ ही म्हणते. मागे साऊथ डाकोटातल्या ब्लॅक हिल्स आणि माऊंट रषमोरला गेलो होतो तिथं एक नीडल पॉईंट म्हणून जागा आहे. कड्यातून रस्ता कोरून काढला आहे त्यामुळे ते सुईच्यात दोरा ओवतो त्या भागासारखा दिसतं. ही जागा पाहून आम्ही बाप आणि लेक एकमेकांकडे पाहात म्हण्टलं 'माळशेजघाट' याला म्हणतात मराठी मन! जगात कुठेही गेलो तरी सह्याद्री कसा विसरावा?

जेरीचा बोगदा ओलांडला की एक वळण येतं त्यानंतर महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचं रिसॉर्ट आहे ऐन मोक्याच्या ठिकाणी. इथून पुढे गेलं की घाट उतरणीला लागतो. डाव्या बाजूसदूरवर एक धरण आहे. धरण आणि रास्ता यात शेती. हिरव कंच धनाचं पीक दृष्टीस सुखावून जातं.
इथून पुढे गेलं की खुबी फाटा लागतो. या खुबी फाट्यावर हरिश्चंद्र गडाचे वारकरी उतरतात.
इथून पुढे गेलं की खुबी फाटा लागतो. या खुबी फाट्यावर हरिश्चंद्र गडाचे वारकरी उतरतात.
वारकऱ्याला जशी विठ्ठल दर्शनाची ओढ तशी यांना कोकण कड्याची आणि केदारेश्वर या एकमेवाद्वितीय जल मंदिराची. धरणाच्या भिंतीवरून नाकाच्या सरळ रेषेत गेलं की ५ कि मी वर खिरेश्वर नावाचे गाव लागते, इथं एक सुंदर प्राचीन शिव मंदिर आहे, मुळात हा सगळा भागच प्राचीन. इथले किल्ले ही प्राचीन आणि पदोपदी याचा दाखला मिळत असतो. असेच पुढे जायचे की तोलारखिंड नावाची फिटनेस टेस्ट द्यायची ही उत्तीर्ण झाली की हरिश्चन्द्रगड सर झालाच म्हणून समजा. मी मात्र हरिश्चन्द्रगड या वाटे ऐवजी इगतपुरी-घोटी-राजूर-पाचनई या मार्गानं केला. पाचनई वरून साधारण तासाभरात तारामती शिखरावर की किल्ला फत्ते! हरिश्चन्द्रगड शिवकाळात कधीच स्वराज्यात नव्हता तो स्वराज्यात आला तो पेशवाईत! Natoinal Geographic च्या छाया चित्रकाराला अजून कोकण कड्याचा शोध लागलेला दिसत नाही. १७ MM च्या wide angle लेन्स मध्ये न सामावू शकणार हे आमच्या ह्या सह्याद्रीच रांगडं वैभव! Its a humongous horseshoe bend, the cliff measures about 3000-3500ft vertical cut! माळशेज ते नाणेघाट एक एक स्वप्नवत प्रवास
या घाटवाटेच्या उतरणीवर उजवीकडे ४००-५०० फूट उंचीवर महाकाय पाषाणाचे दगड आहे, म्हणजे कुणाची लांबी ५००फूट तर कुणाची १००. असच पुढे जात राहिलं की धरणाचं पाणी रस्त्याजवळ येत पावसाळ्याच्या दिवसात, पाणी, आजूबाजूचे सह्याद्रीचे विखुरलेले डोंगर, हिरवाकंच रंग आणि किनाऱ्यावर काही माडाची झाडं दृष्टी सुखावून जातात. मग राहवत नाही म्हणून पुन्हा रस्त्याच्या चढावावर गाडी बाजूला घ्यायची आणि हा देखावा डोळ्यात भरून घ्यायचा. की दुसरा घाट आपली वाट पाहत असतो. ह्या वाटेनं, लेण्याद्री, जुन्नर, पुणे, ओझर कडे जात येते.
महाराष्ट्र देशा नावाचं उद्धव ठाकरेच छायाचित्रांच एक पूस्तक आहे २०११३-१४ सालीच ते पुस्तक प्रसिद्ध झाले होते. त्या पुस्तकातील नानाचा अंगठा आणि नाणेघाट ह्याची छायाचित्र मी पाहिली. आतापर्यंत मी नाणे घाटाची फक्त कीर्ती ऐकली होती पण कधी कुणी प्रत्यक्ष जाऊन आलेल्याकडून छायाचित्र बघीतली नव्हती त्यामुळे नाणेघाट म्हणजे नक्की काय? अन तो नेमका कुठे आहे हे लक्षात यायला २०१४ उजाडावे लागले. पण जशी मी ही छायाचित्र पाहिली तसं मज राहावेना मग गुगलवरून सारे शोधून काढले अन ठरवून टाकले की यंदाच्या पावसाळ्यात नाणी खर्ची घालायची ती फक्त नाणेघाटासाठी. मग एकदिवस सकाळी सकाळी Good Morning ला निघलो शिवाय नाणेघाटावर माळशेज फ्री होता अशी offer कोणी नाही म्हणेल का? नाणेघाटासाठी (मुंबईकडून) माळशेज ओलांडून खाली आले की मढा नावाचे गाव लागते. गाव डावीकडे सारत मुख्य रस्त्यावरून उजवीकडे घाटघर कडे एक रस्ता जातो त्यावर गाडी लावायची, रस्ता थोडा कच्चा आहे (this was in 2014), मी खूप Advanture करून गेलो होतो.
धरणाच्या शेजारून रास्ता आणि धरण यामध्ये पाठशिवणीचा खेळ चालतो त्याची मजा घयायची, वाटेत खूप ओहोळ, नाले, धबधबे आणि पावसात भिजून ओथंबलेला सह्याद्री साथ करत असतो.

रान वाट, ओली झाडं, सुबक छोट्या झोपड्या, पावसात आणि उन्हातान्हात लाल ची करडी झालेली झोपडीची कौलं, ती चरणारी गुरं, त्यांच्या गळ्यातल्या घंटांमधून होणारा तो आवाज अन एका हातात काठी, डोक्यावर घोंगडी घेतलेला गुराखी असा स्वप्नवत देखावा. त्या डोंगर माथ्यावर रांगणारे काळे काळे ढग आपला पाण्याचा खजिना मुक्त हस्तानं उधळतात. हे जे दृश्य आहे ते लाखभर पैसे खर्च करून स्विझर्लंडला गेल्यावर ही बघायला मिळत नाही.
रस्त्यानं बरीच परीक्षा घेतली तरी हळू हळू गाडी चालवत राहिलो. प्रवासाची मजा खरी जर कुणी घेत असेल तर ती माझी मुलगी कारण गेल्या तीन वर्षांच्या अमेरिका वास्तव्यात तिनं असला रास्ता, असला भूभाग आणि अशी माणसं पहिली नव्हती. तिला हे सगळं खूप आवडत होत आणि 'भारत' का अनुभव भी बटोर राही थी! करता करता एकदाचे पोहोचलो नाणेघाटात. इथं एक साधी पाटी सुद्धा लावलेली नाही की हा नाणेघाट, तर माहिती तर दूरची गोष्ट.
त्या जकात जमा होणाऱ्या रांजणाच्या अगदी १०० फुटांवर गाडी ठेवली आणि याची देही याची डोळा, अनेक वर्षांपासून ज्याची वाट पाहत होतो तो नाणेघाट आणि रांजण डोळे भरून पहिला. थोडं वैषम्य असं वाटत की ते दगडातून कोरून काढलेलं २५०० वर्ष जूनं रांजण ऊन, पाऊस-वारा, जनावरं यांचे तडाखे खात निपचित पडून आहे बिचारं. कुणालाच कसं काही वाटत नाही? की त्याची थोडी निगा राखली पाहिजे त्यावर एखाद सुबक घुमटी त्यावर थोडी परिसराची माहिती. जाऊद्या आमच्यासारखे येऊन बसले परदेशात, दुसऱ्यांना काय बोलायचं? ते रांजण आता आहे. आजपासून आणखीन १०० वर्षांनी टिकेल? अरे पूर्वजांनी एवढं भरभरून ठेवलं आहे ते जपतो म्हंटलं तर जन्म खर्ची जाईल पण आपण भारतीय आहोत ना. करंटेपणा, आमच्यात असा काही भिनला आहे की विचारता सोय नाही. योगासनांचा योगा झाला. अमेरिकन भारतीयांना योगा शिकवतात आणि आम्ही बेश्रमसारखे ह्याह्या करत शिकतो. नाणे घाट अमेरिकेत असताना, तर काय शानेंन मिलरवला असता त्यांनी आणि असा जपला असता की तळ हातावरचा फोड! एक व्हिसिटर सेंटर बांधलं असत त्यात एखाद सुंदर documentary दाखवली असती.Would have added a gift shop with attractive souvenirs. सारा परिसर एका ट्रेलन जोडला असता त्यावर जागोजागी माहिती फलक लावले असते. नाणे घाट National Monument and Preserve (नाणे घाट राष्ट्रीय स्मारक आणि सुरक्षित क्षेत्र) म्हणून त्याचा तर विकास केलाच असता पण आजूबाजूच्या परिसरातला शेतकरीही या पर्यटनामुळे भरभराटीस आला असता. नाणे घाट नाणे घाट राष्ट्रीय स्मारक आणि सुरक्षित क्षेत्र चे फलक १०० मैल आधीपासून लावून एकच माहोल केला असता का आपल्या रंग्या ड्रायव्हरलाही वाटलं असत का सालं एकदा हे नाणे घाट काय भानगड आहे ते पाहूनच घ्यावं!
थोड्या कल्पकतेची आणि इच्छा शक्तीची गरज आहे. मी जेव्हा माझ्या बरोबर काम करणाऱ्या अमेरिकन साथी दारांना हे असलं सगळं दाखवतो आणि सांगतो ते इतके भारावून जातात की काय सांगू! त्या सगळ्यांना भारत पाहायची प्रचंड इच्छा मनात जागी झाली आहे. मग म्हणतात आमच्या साठी तर ३००-३५० वर्षांपलिकडे आणि अमेरिकेच्या पलीकडे काही इतिहास आहे याचा विचारच करू शकत नाही.
नाणे घाटात त्या रांजणापलीकडे थोड गेलं की दोन्ही कडे गुफा आहेत माझ्यामते या बौद्ध गुफा असतील? किंवा जकातीच्या कामावर असणारे कर्मचारी येथे राहात असतील? २५०० वर्षांपूर्वीचा वहिवाटीचा रस्ता मग इथं सारया असतील? घोड्यांच्या निवासाची सोया असेल? पाणवठे असतील? बैलगाड्याची, बैलांची सोय, हमाल असतील? कारण इथून खिंड उतरवून बैलगाडी जाण शक्य नाही. घोडा किंवा पायी. म्हणजे वरची जनावरं वर अन खालची खाली. याचा अर्थ खाली सुद्धा सगळ्या सोयी असणार ज्या वर आहे. सामान वर खाली करणारे अनेक हमाल इथं असतील. शातवाहन राजांनी नाणेघाट बांधला त्याच्या बदल्यात ही कर वसुली होत होती म्हणजे आजच्या सारखा टोल २५०० वर्षांपूर्वीही वसूल होत होता!

थोड्या अंतरापर्यंत रस्ता चांगला बांधलेला आहे नंतर मात्र एकदम दगड आहेत आणि एकदम उतार आहे. खूप धुकं असल्यानं काही दिसत नव्हतं म्हणून मी ही उगाच साहस करण्यात वेळ न घालवता असलेलच्या वेळात आजूबाजूचा परिसर पाहण्यात जास्त धन्यता मानली. पहिला प्रयत्न नानाच्या अंगठ्यावर चढायचा केला. ३५-४५अंशात चढण कठीण, याशिवाय ओलं गवत पाय घसरत होता. थोडी उंची गाठल्यावर लक्षत आलं की आपली पादत्राणे इथं कामाची नाही. त्यामुळं तिथून माघार घेत उजव्या बाजूस मोर्चा वळवला.
उजव्या बाजूला वर गेलो तर नानाच्या अंगठ्या वर एक वीर Rock Climbing (प्रस्थरारोहण ?) करत होता. इथं चढाई करायला खरंच वाघाचाच काळीज पाहिजे. समोर धुकं बरच होतं त्यामुळे खालचं खूप काही दिसत नव्हतं. थोडं इकडून-तिकडून डोकाव केलं. हे डोळ्यात साठवून उतरू लागलो. उजव्या हाताला थोडं पलिकडे जीवधन किल्ला आहे त्या किल्ल्याचे २-४ सुळके लक्ष वेधून घेतात. एका छोट्या डबक्यात त्या जीवधन किल्लयाचे प्रतिबिंब खूप आकर्षक दिसत होते. असं वाटतं किल्ल्याच्या डोंगरमाथ्यावरच्या ढगांना कशाचितारी ओढ लागली आहे सतत पुढे जात असतात ह्यामुळे डबक्यातलं प्रतिबंब क्षणाक्षणाला बदलत असतं. थोडावेळ ते निरखत उभे राहिलो. ह्या डोगररांगानी कितीक काळ पहिला २५०० वर्ष!
आता मात्र नाणेघाटाचा निरोप घ्यायची वेळ आली होती. ते दृष्य पुन्हा एकदा डोळे भरून पहिलं आणि कार रस्त्याला लावली.
नाणेघाटाकडून निघालो मुद्दाम ह्या वेळी धरणाच्या पलीकडल्या बाजूचा रास्ता निवडला हा रस्ता जुन्नर कडे मुख्य रस्त्याला येऊन मिळतो. या रस्त्याला लागलो तेव्हा थोडं आभाळ निवळलं होतं आणि आभाळाच्या जळमटातून सोडवून ऊन डोकावू लागलं होतं. दुपार टळून संध्याकाळ कडे झुकणारी वेळ, ऊन पावसाचा खेळ अन डोंगरांच्या हिरव्या गार पाठीवर गोंजारणार ते सोनेरी ऊन. त्या सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघत त्या फाट्यावर आलो. उजवीकडे जुन्नर, पुणे सोडत पुन्हा माळशेज घाटाच्या दिशेनं डावीकडे गाडी वळवली. थोडं पुढं गेल्यावर रस्त्याच्या दुतर्फा वडाची मोठ्ठाली झाडं, दाट सावल्या अन खुणावणाऱ्या पारंब्या. गाडी कडेला थांबवली अन मी बाहेर पडून लटकायला पारंबी शोधू लागलो. अश्विनी आणि आसावरी मात्र प्रश्नार्थक चेहऱ्याने माझ्याकडे पाहत होत्या की नेमकं झालय काय? मग एक लटकण्याजोगी पारंबी शोधली आणि लटकू लागलो. इतक्या आसावरी येऊन उभी राहिली. तिलाही लटकायचे होते पण हिम्मत होईना, हा परदेशात राहिल्याचा तोटा! मग तिला खूप तयार केलं हिम्मत दिली तेव्हा तयार झाली. मग इतकी मजा येऊ लागली की उतरायला तयार नव्हती.
पारंब्यांवर झुलायची मजा घेऊन हॉटेल कडे निघालो. माळशेज घाटाच्या पायथ्याशी एका तलावाशेजारी एक हॉटेल आहे. महत कष्टानं हे हॉटेल मिळालं होतं. त्यानं खरंच जुन्या एका खोलीला तात्पुरतं आमच्यासाठी राहण्याजोगं केलं होत. तास दीड तासानं दारावर बेल वाजली दार उघडलं तर हॉटेलचा एक गडी म्हणाला
"साहेब आज एक बरिच मोठी पार्टी जेवायला आहे, तेव्हा तुम्हाला जेवण घ्यायचं असेल तर लवकर ऑर्डर करा, माझ्या कडे दिली तरी चालेल."
मी म्हंटल "दाल खिचडी मिळेल?"
तर लगेच हो म्हणाला,
"इथंच खोलीत आणून देऊ का?"
म्हंटल "धावेल"
रात्री दाल खिचडी खाऊन झोपी गेलो गाडी चालवून थकलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी योगेश, साडूभाऊ, त्यांचे एक मित्र जिचकार आणि कुटुंब येऊन आम्हाला मिळणार होते. आमचा हा योगेश म्हणजे एक वल्ली आहे. याला कुठेही चलतो का हे विचारलं की लगेच "यो" म्हणेल! बाकी भूगोल-इतिहास वगैरेशी फारसा संबंध नसतो म्हणजे याचा सिहगड कोल्हापूर ते गोवा कुठेही असू शकतो!! असो. दुसऱ्या दिवशी लेण्याद्री आणि शिवनेरी असा प्लॅन होता. पण आज आम्ही जे पाहिलं ते आम्हीच पाहिलं. नाणे घाटात कच्या रस्त्यावर गाडी घालायला आमचं मंडळ सहजासहजी तयार झालं नसत.
देवदर्शन आणि शिवजन्मक्षेत्र शिवनेरी
सकाळी ठरल्याप्रमाणे मंडळी आली आणि लगलेच निघालो. पुन्हा तोच पुण्याकडला रास्ता, घाटाची दोन वळणं चढलो ते गाड्या रस्त्याबाजूला थांबवल्या. मंडळाचं म्हणणं होत की इथंच घेऊ या नाश्ता. समोरच दृश्य म्हणजे एखाद्या Picture पोस्टकार्डवर असत तास होतं, स्वप्नवत! हिरवे डोंगर, त्यावर ढगांची गर्दी मधे तलाव, तलावातली बेटं, माडाची किनाऱ्यावरली झाडं आणि आम्ही घाटाच्या उंचीवर असल्याने या सौंदर्यात भर घालणारी उंची. इडली चटणीचे इंधन पोटात भरले, याच इंधनावर लेण्यांद्री आणि शिवनेरी चढायचा होता.
रास्ता गणेश खिंडीतून जातो, तिथे लिहिलेलं आहे या खिंडीतून शिवाजी महाराज गेले आहेत. मग माझ्या मनात विचार आला के हे खरं असेल का? तेव्हा लक्षात आलं की जेव्हा औरंगजेब दक्षिणेचा सुभेदार होता, शहाजहान बादशहाची तब्येत बिघगडली व औरंगजेब दिल्लेकडे निघाला. त्याच्या काहीच दिवस आधी महाराजांनी एक राजकीय डाव खेळला होता. औरंगजेबाकडे वकील पाठवून (सोनोपंत डबीर) दिला त्याला सांगितलं की आम्ही मुघलांचे अंकित, तुम्ही आज्ञा कराल तेव्हा हजर होऊ. तुम्ही आमच्या कार्याला परवानगी द्या आम्ही तुमच्या वतीने दक्षिणेचा कारभार पाहू, अश्या अनेक भूल थापा दिल्या. आठ दहा दिवसात औरंगजेब दिल्लेकडे निघाला. त्याची पाठ जशी वळली तसं महाराजांनी जुन्नर (हे मुघलांच महत्वाचं ठाणं) लुटलं. या छाप्यात त्यांना कापड-चोपड, किमती वस्तू, घोडे आणि काही खजिना हाती लागला. तेव्हा अगदी खात्रीलायक पुरावा नसला तरी या वाटेनं महाराज गेले असतील याची दाट शक्यता आहे.
लेण्यांद्रीस पोहोचलो वाहनतळाची सोय बरी आहे. लेण्याद्री गणपती चढण्यास फारसा कठीण नाही अरे अरे करेपर्यंत गणपतीबाप्पा मोरया! बरोबर असलेली सगळी मुलं भरभर चढली. मंदिरात न रेंगाळता लवकर आटपून खाली आलो. शिवनेरी गाठला, किल्ला तसा दुरून लक्षात येतो एक खूण अशी की शिवनेरी किल्ल्याच्या पोटात लेणी आहेत. दूरदर्शनच्या जमान्यात अप्पा (गो. नि) दांडेकरांची एक मुलाखत ऐकली होती त्यात अप्पा सांगतात "ज्या किल्ल्यांवर लेणी आहेत ते किल्ले अदमासे सहाव्या किंवा सातव्या शतकातले आहेत." हरिश्चंद्र गडावरचं केदारेश्वर मंदिर सुद्धा ६ व्या शतकातलं, राजमाची (लोणावळ्याजवळ, कर्जतच्या बाजूला) किल्याच्या पायथ्याशी असलेली कोंडाणे लेणी सुद्धा २५०० वर्ष जुनी, तशीच लोहगडाजवळची भाजे सुद्धा. त्यामुळे शिवनेरी किल्ला ही प्राचीन. शिवनेरी किल्ला बघायची ही माझी दुसरी वेळ. याआधी मी आणि माझा भाऊ पुण्याहून स्कुटरवर निघालो पहिले शिवनेरी चढलो मग भीमाशंकरला गेलो आणि Good evening ला घरी येऊन पावते झालो, दिवस होता १७ एप्रिल १९९९, दिवस यासाठी लक्षात आहे की याच दिवशी अटलबिहार वाजपेयीचं १३ महिन्यांचं सरकार केवळ एका मतानं पडलं होतं!

शिवनेरी किल्ल्यावर पोहोचलो नेहमी प्रमाणे वाहनासाठी जागा मिळेना तरीपण थोडक्यात निभावले. शिवनेरीची चढायला सोपा. शिवनेरीवर एक सुखद धक्का बसला, शासनाला उपरती झाली म्हणायची. शिवनेरी किल्ल्यावर बरच पडलेलं जूनं बांधकाम, पुन्हा निर्माण केलं आहे. तुटलेले बुरुज, चढायची दगडी वाट, दरवाजे नव्यानं उभे केले आहेत. चांगली गोष्ट अशी की पडलेला बुरुज पूर्ण न बांधता ढासळलेला भाग पुन्हा ढांसळणार नाही याची काळजी घेत तेवढा बांधून काढला आहे. दगड आणि इतर साहित्य जुन्याशी मिळतं-जुळतं वापरलं आहे, बऱ्याच ठिकाणी माहिती फलक लावले आहेत. म्हंटल good job महाराष्ट्र शासन!
पोरं थोडी कंटाळली होती. किल्ला का बघायचा? ह्या पडक्या भिंती अन भग्नावशेष का बघायचे? हे लहानमुलांना नीट समजावून सांगणं आवश्यक आहे पण ते असं एका दिवसात नाही. तरीपण मी यांच्या उत्साह यावा आणि थोडं साहस म्हणून एक युक्ती केली. वळणावरल्या एका उंचवट्यावर चढलो भरभर, माझ्या मागे आसावरी आली आणि आसावरीमागे एके एक जण चढू लागला. सगळ्यांना हे भारी आवडलं. मग पोरांना किल्ला चढायची मजा येऊ लागली. मजल दर मजल करत साधारण पाऊण तास ते एका तासात शिवजन्माच्या ठिकाणी पोहोचलो. दगडातून बांधून काढलेली ही दोनमजली इमारत अजूनही भक्कम आहे. हे महाराष्ट्राचं खरंच एक तीर्थक्षेत्र. याचबरोबर प्रत्येक भारतियांन जीवनात एकदातरी पाहावं अशी ही ठिकाण म्हणजे राजगड, रायगड शिवनेरी आणि शिवलंका सिंधुदुर्ग!
परतीला लागलो खूप भूक लागली होती म्हणून लिंबाचं सरबत, पेरूची मजा घेणं सुरु होत. मंडळान खाली गेल्यावर एका हॉटेलात गाड्या थांबवल्या जेवण उरकली. हातावर पाणी पडलं तस आम्ही तिघ ठाण्याकडे निघालो. आम्हाला थांबवण्याचा खूप प्रयत्न झाला पण दुसऱ्या दिवशी एक सहल घेऊन मला तलासरीच्या वनवासी कल्याण आश्रमात जायचं होतं. मीच आयोजक होतो त्यामुळे इलाज नव्हता.
पण या सहलीत माळशेज घाट आणि नाणे घाट असा मनात साठवून घेतला ते नेहमीसाठी.
-अमोल दाण्डेकर









